Uncategorized

प्रशासनाने चारा छावणी तत्काळ चालु महाराष्ट्र विकास सेना पक्षाची मागणी

माळशिरस प्रतिनिधी.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणावा असा पाऊस पडला नाही महाराष्ट्रातील अनेक तलाव धरणे ही कोरडी पडलेले आहेत जनावराच्या चाऱ्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे लोकांनी आपल्या गरजेपोटी शेती कामासाठी सांभाळलेली दुग्ध व्यवसायासाठी सांभाळलेले पशुधन जनावरे कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आलेली आहे मुक्या जनावरांना चारा नाही पाणी नाही शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे परंतु त्याची तात्काळ अंमलबजावणी नाही सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी सरकारची कार्यपद्धती आहे तरी महाराष्ट्र विकास पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तात्काळ मागणी करणार आहे की दुष्काळग्रस्त भागांमध्ये तात्काळ जनावरांसाठी छावण्या उभ्या करण्यात यावीत तसेच महाराष्ट्र सरकारने गोरगरीब लोकांना रेशन कार्ड धारकांसाठी व दिवाळीसाठी आनंदाचा दिवाळीचा शिधा तसेच ज्या रेशन कार्डधारकांना माल मिळत नाही अशा सर्व रेशन कार्ड धारकांना तात्काळ धान्य देण्याची व्यवस्था करावी बेरोजगारांना रोजगाराची व्यवस्था करावी इत्यादी अनेक मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी आवाज उठवणार असा इशारा अनिल दादा साठे महाराष्ट्र विकास यांना पक्ष प्रदेश सचिव यांच्याकडून देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button